शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

शुभ सकाळ SMS - ३

मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि  स्वतःविषयीच नाराज होतो.
पण आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते.
आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..!
आपला दिवस आनंदाने बहरुदे.
    🌹 सुप्रभात 🌹

......................................................................................................................................

🌸सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच नसत हसून हसून जगायच असत.
🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच नसत काट्यात सुद्धा हसायच असत.
🌼बकुळी म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत.
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच नसत संकटाना बुडवून फुलायच असत.
🌾🍃🍂🌾🍃🍂🌾🍃
            ... शुभ प्रभात …
      तुमचा दिवस आनंदात जावो.
          आणि मन प्रसन्न राहो.....
        🌞🌞🌞🌹🌞🌞🌞

......................................................................................................................................

वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं. त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण ज्या मुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही. काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असावं दिसत नसलं तरी गोडवा आणि आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत.
🌹🌹🌹👏

......................................................................................................................................

🍃🌾🍃🌾🍃🌾🍃
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही ,
 पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही...
 
🌾🍃शुभ सकाळ 🍃🌾
सुंदर दिवसाच्या सुदंर शुभेच्छा

......................................................................................................................................

मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात..,
माणसाचं ही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही...! 
" ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं "...!

    💐 सुप्रभात 💐😊

......................................................................................................................................

✍🏻 आठवण येणे
                'आणि'
           आठवण काढणे
     यात खुप फरक आहे....!
आपण आठवण त्यांचीच काढतो, 💞💞
      जे आपले आहेत.........!
                 'आणि'
        आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात.........! 💞💞

      💐🌺 सुप्रभात 🌺💐

💐💐💐♈💐💐💐

......................................................................................................................................

🌹😘 💐💐💐😘🌹
जेंव्हा मायेची आणि
‪‎प्रेमाची‬ माणसं आपल्या
 ‪‎जवळ‬ असतात..
तेव्हा‬ दुःख ‪कितीही
मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪
वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.
    ••○○🌞शुभ सकाळ 🌞○○••
🐾⚜🐾 ** 🐾⚜🐾
   ||आपला दिवस आनंदात जावो||
🌸🌿🌸🌿🌲🎋🌸🌿🌸🌿

......................................................................................................................................

💐💐 सुंदर विचार💐💐
जीवनात कोणतीच गोष्ट *फुकट मिळत नाही.इथे
श्वासालाही किंमत मोजावी लागते.एक श्वास
सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही..
जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा
त्याने मानवाला तीन पाने दिली. पहिल्या
पानावर "जन्म" लिहिला आणि
तिस-या पानावर "मृत्यू" लिहिला.
जे दुसरे पान कोरे ठेवले. ते मानवाच्या हातात
आहे.मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते.या
दुस-या पानालाच "जीवन" म्हणतात.                    
🌺🌻🌞 शुभ प्रभात 🌞🌻🌺
       🌴🌴🌴🌴

......................................................................................................................................

आपल मन म्हणजे किनारा नसलेला अथांग सागर आहे ज्याने अनेक गोष्टि सामावून घेतलेल्या आहेत  

जो पर्यत आपण आत डोकावून पाहत नाही तो पर्यंत या अथांग सागरात उठणा-या लक्ष तरंगाची जाणीव ही आपल्याला होत नाही.

कोणाच्या अंतरंगात कायमची जागा प्राप्त करायची असेल तर एकदा तरी त्यांच्या मनात नक्की डोकावून पहा...हाती काहीतरी नक्कीच लागेल

           ✨✨ॐ साई राम✨✨
               🍂🌹सुप्रभात🌹🍂

......................................................................................................................................

नाती तयार होतात..
      हेच खूप आहे.......

 सर्व आनंदी आहेत...
      हेच खूप आहे.......

   दर वेळी प्रत्येकाची
       सोबत होईल असं  नाही...

  वॉटस्ऍपच्या निमित्ताने  एकमेकांची आठवण....
        काढतो आहोत
        हेच खूप आहे.......
              Good morning
    🍁🍁🍃🌿🌿
.......................................................................................................................................

आणखी मराठी SMS पाहण्यासाठी ही अॅप डाउनलोड करा.

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

शुभ सकाळ SMS - २

🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

खरं बोलून मन दुखावल तरी चालेल...
पण खोट बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका...
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात...
तुम्ही  यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात...🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

            🌺 शुभ सकाळ🌺

..............................................................................................................................

" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो..।।
" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो..।।
" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो..।।
" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात..।।
प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा..।।

     🍁 ।।शुभ सकाळ।। 🍁
💐 आपला दिवस आनंदात जावो💐

..............................................................................................................................

फुलाला फुल जोडत गेलं कि फुलांचा एक  हार तयार होतो...
आणि माणसाला माणूस जोडत गेलं कि माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं...
🌺 शुभ सकाळ🌺

..............................................................................................................................

परिवारा पेक्षा_श्रेष्ठ_पैसा_नाही
वडीलां पेक्षा_श्रेष्ठ_सल्लागार_नाही.
आई पेक्षा_श्रेष्ठ_जग_नाही
भावा पेक्षा_श्रेष्ठ_भागीदार_नाही
बहिणी पेक्षा_श्रेष्ठ_शुभचिंतक_नाही
मित्रां_शिवाय_आयुष्य_नाही.
म्हणून परिवार शिवाय "जिवन" नाही.
      ••●‼शुभ सकाळ‼●••
      💐|| Good Morning ||💐
              🌷सुप्रभात 🌷
   ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||
 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

..............................................................................................................................

............................................................

      पक्षी जीवंत आहे तोपर्यंत मुंग्या खातो;
            जेव्हा पक्षी मृत असतो तेव्हा
                मुंग्या पक्षांना खातात
                  वेळ व परिस्थिती
           कोणत्याही वेळी बदलू शकते.
  जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका
            किंवा कोणाला दुखवू नका.
....................................................
  🌼🍀🌼|| सुप्रभात || 🌼🍀🌼

         तुमचा  दिवस  आनंदात  जावो.

..............................................................................................................................

💖🌿💖 शब्दशिल्प 💖 🌿 💖

   कुणी चांगले म्हणावे म्हणून
  काम करू नका ,
 आपण करीत असलेल्या कामाने
   अनेकांचे भले होणार असल्यास
   ते काम सोडूच नका. 
  जर आपला हेतुच शुध्द आणि
   प्रामाणिक असेल तर...
       आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
   टीकेला काहीच महत्व नसते
 चांगल्या कर्मांची फळे 
    चांगलीच असतात.
मुखातून गेलेला साईराम आणि
     निस्वार्थापणे केलेले काम 
   कधीही व्यर्थ  जात   नाहीत."                                      
      🌷  सुप्रभात 🌷
    ‼ जय साईनाथ ‼

..............................................................................................................................

🌿🌷क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते...कधी तरी...कुठे तरी...केव्हा तरी असा क्षण येतो, जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो..😊
फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे...यालाच "आयुष्य जगणे" म्हणतात...☕🌷🌿
   💐 शुभ सकाळ 💐
💐सुंदर दिवसाची सुंदर सुरवात 💐😊😊😊😊😊😊😊😊

..............................................................................................................................

'मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत...' कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी!
भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल  पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.
😊 ◆ शुभ प्रभात ◆ 😊

..............................................................................................................................

माणसाने समाजात जगण्या साठी रक्ताची बरीच नाती उभी केली.
काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्याच्या जवळ असतानाही, एकच नात जे खुद्द परिस्थिने उभं केलं ते म्हणजे मैत्रीच नात, जे रक्ताचं नसल तरी वेळेला पहिलं धावून येत कसलीही अपेक्षा नसताना.
        😊 ◆ शुभ प्रभात ◆ 😊

..............................................................................................................................

नावासाठी काम करू नका.
कामासाठी काम करा. 

जे कामासाठी काम करतात
त्यांचाच नावलौकिक होतो.

 लक्षात ठेवा अगोदर
कामावरून नाव होते
आणि नंतर 
नावावरूनच काम होते.
💐🍁 Good Morning🍁💐

..............................................................................................................................

आणखी मराठी SMS पाहण्यासाठी ही अॅप डाउनलोड करा.

शुभ सकाळ SMS - १

पानाच्या हालचाली साठी
              वारं हवं असतं,
        मन जुळण्या साठी नातं
                हवं असतं,
        नात्यासाठी विश्वास हवा
                 असतो,
        त्या विश्वासाची पहिली
             पायरी म्हणजे?
                " मैञी "
      मैञीचं नातं कसं जगावेगळं
                  असतं,
       रक्ताचं नसलं तरी मोलाचं
              असतं ...!!!
   || ।  शुभ सकाळ  ||

...........................................................................................................................

सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
  खूप जणं आपल्या जवळ येतात आणि दुरावतात...
   सूर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते...
  पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात....
           जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life"
                 आणि...
 त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" ...!                       😊🌺😊🌺😊🌺😊🌺😊🌺😊                                              
🌷सुप्रभात🌷

...........................................................................................................................

🍇🍒🍇🍒🍇🍒🍇🍒🍇🍒
सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,

निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!

मनापासून आठवण काढली आहे
तुमची,

पुन्हा म्हणू नका आपली
 माणसे
विसरून जातात....!!!
Good morning
🍇🍒🍇शुभ प्रभात🍒🍇🍒

...........................................................................................................................

हसता तितक्याच हक्कानं
रुसता आलं पाहिजे...
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी
 अलगद पुसता आलं पाहिजे.

मान-अपमान नात्यात  काहीच
 नसतं.
आपल्याला फक्त
समोरच्याच्या हृदयात घुसता
       आलं पाहिजे..!!!

     🌺 शुभ सकाळ 🌺

💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💐

...........................................................................................................................

💐🍂🌿🌱☘🍀🍃🌾💐
ह्रदयापेक्षा सर्वात चांगली 
सुपीक जागा कुठेही नाही.

कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून....
 पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो किंवा कोणावरचा राग/द्वेष.
💐शुभ सकाळ  💐

...........................................................................................................................

“तुमच्या विचारातून तुमचे व्यक्तिमत्व झळकत असते, त्याकडे तुमचे लक्ष नसले तरी इतरांचे लक्ष असते."
"प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरुन त्यांची पात्रता कळते तुमची नाही."
😊 •• शुभ प्रभात •• 😊

...........................................................................................................................

💐 अमृत वाणी 💐
रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही 
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच, 
आपले जीवनही पुसले जाणार आहे 
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
         
 🌹 || शुभ दिवस ||🌹
     तुमचा दिवस आनंदात जावो.
           मन प्रसन्न राहो..

...........................................................................................................................

🌹🌸🍃🍃🌺🍃🍃🌸🌹

श्रेष्ठता जन्माने मिळत नाही. 
ती आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळते किंवा मिळवावी लागते.. 

दही,  दुध व तुप यांचे मुळ जरी एकच असले तरी या सगळ्यांची किंमत वेगवेगळी असते..👏👏
           🌺🌺

     ☕शुभ सकाळ☕
🌹🌸🍃🍃🌺🍃🍃🌸🌹

...........................................................................................................................

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
✌🏻चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
      ते कायम आठवणीतच राहतात... 👉 तुमच्यासारखे....ღღ 
     😊 शुभ प्रभात  😊
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

...........................................................................................................................

दोन अक्षरांचे 'लक', 
अडिच अक्षरांचे 'भाग्य' 
तीन अक्षरांचे 'नशीब' ऊघडण्यासाठी,
चार अक्षरांची मेहनत' उपयोगाला येत असते तर 
एक अक्षराचा 'मी' माणसाचे जीवन नष्ट करते.
😊 •• शुभ प्रभात •• 😊

...........................................................................................................................

आणखी मराठी SMS पाहण्यासाठी ही अॅप डाउनलोड करा.